न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित्त दिनांक ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व अग्निशमन प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत.
अग्निशामक विभागाने आग कशी विझवावी, अतितातीडीच्या वेळी अग्निशामक साहित्य कसे हाताळावे याची प्रात्यक्षिके यावेळी करून दाखविली.
यावेळी अ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता दीपक सुपेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, अग्निशामक दलाचे सब ऑफिसर ऋषिकांत चिपाडे, अ व फ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच व परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.












