न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवडमधील अजमेरा-मोरवाडी परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी तोकडे पडत असून या परिसरात रहदारी वाढली आहे. मोरवाडी परिसरातील टेल्को सिमाभिंतीलगतचा अपूर्ण रस्ता त्वरित पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे दत्तात्रय भालेराव यांनी ‘ग प्रभाग’ अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अजमेरा-मोरवाडी या परिसरातील रसरंग चौकापर्यंत प्रचंड रहदारी वाढली असून, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, वृद्ध व लहान मुले व नागरिकांना हा रस्ता ओलांडण्यास त्रास होत असून अपघातास निमंत्रण मिळत आहे.
आजपर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात या परिसरात झालेले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोरवाडी परिसरातील टेल्को सिमा भिंतीलगतचा अपूर्ण रस्ता त्वरित पूर्ण करण्याकरीता प्रभाग अधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष घालून रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.












