न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू :- देहुगावातील विठ्ठलनगर परिसरातील ओंकार सोसायटीत गेली तीन ते चार महिन्यांपासून पथदिवे बंद अवस्थेत आहेत. साधारणपणे २५ ते ३० पोलवर अद्यापही वीज नाही.
समस्या वेळीच ओळखून भाजपचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे यांनी विद्युत वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता यांना पथदिवे लवकरात बसवण्याबाबत निवेदन दिले. जर कार्यवाही झाली नाही तर, रहिवाशांच्यावतीने कार्यालयास टाळे ठोकू असा पवित्रा बाळासाहेब काळोखे यांनी यावेळी घेतला.
परिसरात पथदिव्यांच्या अभावी रात्रीच्या वेळी रस्त्यावर काळोख दाटून येत असून त्यामुळे समोर कोण? आहे हे दिसत नाही, तसेच या संधीचा फायदा घेऊन परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे नाहक नागरिकांना याचा त्रास होत आहे असे काळोखे यांनी निवेदनात नमूद केले आहे.












