न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- सत्ताधारी पक्ष वाढत्या इंधन दरवाढीची तूट नागरिकांच्या माथी मारीत आहे. नागरिकांची आर्थिक गणिते बिघडविण्याचे काम करीत असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यातही सरकारला सपशेल अपयश आले आहे.
एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष नागरिकांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही. या अनुषंगाने वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसने गुरुवार, दिनांक ११ ऑक्टो. रोजी शहरातील पेट्रोल पंपावर निदर्शनाच्या माध्यमातून सरकारविरोधी पत्रके वाटून, जनजागरण आंदोलन केले.
दापोडीतील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. दापोडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, मोशी, चिखली, भोसरी, सांगवी या परिसरातील पेट्रोल पंपावर जाऊन युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिका-यांनी आंदोलन केले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, युवकचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, सरचिटणीस डॉ. स्नेहल खोब्रागडे, गौरव चौधरी, अनिकेत आरकडे, सिध्दार्थ वानखेडे, अक्रम शेख, विरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, संदेश बोर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दर कपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग करण्यापेक्षा सरकारने पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटी मध्ये समावेश करावा. राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.












