न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- चिंचवडमधील श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयच्या वतीने मंगळवार दिनांक ९ रोजी “मी दुर्गा” या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते.
वाढत्या गुन्हेगारीपासून मुलींचे संरक्षण व्हावे, आपल्या विद्यार्थ्यांनी भूलथापांना बळी पडू नये, तसेच पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून मुलींवरील अत्याचारबाबत प्रबोधनात्मक उपाय सामाजिक कार्यकर्त्या प्रा. शैलेंजताई सांगळे यांनी व्याख्यानाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमात विद्यालयाच्या आणि कॉलेजच्या मिळून ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाप्रमुख अण्णासाहेब जाधव हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुणेरी पगडी, उपरणे देऊन संस्थाप्रमुखांनी सत्कार केला.
यावेळी विद्यालयाचे संचालक विजय जाधव, अमित बच्छाव, मुख्याध्यापक बाळाराम पाटील, देशपांडे मॅडम इ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक दत्तात्रय भलेराव यांनी तर पर्यवेक्षक अनिल कर्पे यांनी आभार मानले.