न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- महापालिका आयुक्तांनी मा. नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्दबातल केल्यानंतर परत कायद्यान्वये पद वाचवता येईल का?
याबाबत गुरुवार दिनांक ११ रोजी कायदा विभागाकडून अभिप्राय मागितला असून येत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था, नियम व अटी शर्थी याबाबत काय सांगतात? यावर आयुक्तांनी कायदा विभागाला निर्देश दिले आहेत.
कायदा विभागाकडून याबाबत अद्याप अभिप्राय आलेला नसून तो शनिवारी किंवा सोमवारी येईल, असे कायदा विभागाचे अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी स्पष्ट केले आहे.