न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी :- निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कुलमध्ये भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सविता किरंगे यांच्या हस्ते हत्ती देवतेचे पूजन करून या कार्यक्रमची सुरुवात झाली. शाळेतील सर्व विद्यार्थी यात उत्साहाने सहभागी झाले होते.
मुलींनी आणि शिक्षिकांनी भोंडल्याची गाणी म्हटली, त्यानंतर सर्व मुलींनी फेर धरून दांडिया आणि नवरात्री विशेष गरबा नृत्याचे सादरीकरण केले. यावेळी नवरात्री भवानी मातेचे जागर नृत्य पाचवी व सहावीच्या मुलींनी खूप सुंदर रित्या सादर केले.
कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक योगेश जाधव, मनीषा कुलकर्णी,योगेश देवळे , राधिका थत्ते यांनी केले