न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी :- उद्या रविवार दिनांक १४ ऑक्टो. रोजी भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृह येथे आमदार महेश लांडगे यांच्यावतीने ‘शिक्षक गौरव समारंभ’ चे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शहरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळा व शिक्षक यांना सन्मानित करण्यात येणार असून प्रसिद्ध शाहीर बाळासाहेब काळजे प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा व लोकगीत “ही दौलत महाराष्ट्रची” या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सर्व शिक्षकांच्या शैक्षणिक समस्या, अडीअडचणी समजून घेण्यात येणार असून, सन्माननीय आमदारांसोबत चर्चासत्राचेही आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महानगरपालिका, जिल्हापरिषद, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक काॅलेज मधील सर्व शिक्षक, शिक्षिका व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.