आज गेली २८ वर्षांपासून काळेवाडी, रहाटणीतील भारत ट्रेडर्स हे नाव किरणा, भुसार व गहू-तांदूळ महोत्सवच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरी पोहचले असून, आपला प्रामाणिकपणा, सचोटी व नाविन्यपूर्ण सेवेद्वारे हजारो ग्राहकांशी नाळ जोडली आहे. ग्राहकांमध्येही आपली विशेष ओळख निर्माण केली असून भारत ट्रेडर्स हे नाव शहरातील ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे.
भारत ट्रेडर्सने ग्राहकांच्या सोयींकरीता आपली व्याप्ती वाढवण्याचे ठरवले असून विशेष प्रयत्नांती व खास वाकडकरांच्या आग्रहास्तव व विश्वासाच्या बळावर आपली कार्यकक्षा रुंदावली आहे. येत्या विजयादशमीच्या मुहूर्तावर (दि. १८) गुरुवार रोजी वाकड परिसरातील छत्रपती चौक येथे आपल्या नवीन दालनाचा भव्य शुभारंभ होणार असून ‘बी मार्ट’ असे, या दालनाचे नामकरण करणार असल्याचे भारत ट्रेडर्सचे मालक अर्जुन खामकर व सतीश खामकर यांनी सांगितले.
वाकड परिसरातील ग्राहकांकरिता या ‘बी मार्ट’ च्या माध्यमातून खास दसरा दिवाळीनिमित्त विविध प्रकरच्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स असून, या दालनात ज्या वस्तू इतर ठिकाणी वाढीव किमतीत उपलब्ध आहेत, त्या वस्तू या ‘बी मार्ट’ मध्ये अगदी माफक किमतीत उपलब्ध होणार आहेत. ‘बी मार्टमध्ये’ लाकडी घाण्याचे तेल तसेच शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताद्वारे पिकविलेल्या वस्तूंचा समावेश असून ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्ट्कोनाचा विचार करूनच वस्तूंचा समावेश आम्ही आमच्या दालनात करतो, अशा या आपल्या रोज लागणाऱ्या वस्तूंपासून ते सौंदर्य प्रसाधनापर्यंतच्या वस्तूंचा समावेश या बी मार्टमध्ये असणार आहे, असे सतीश खामकर यांनी सांगितले.
दसरा-दिवाळी उत्सवाकरीता कमीत कमी २००० रुपयांच्या खरेदीवर मोफत व आकर्षक भेटवस्तू हमखास ग्राहकांना मिळणार आहेत. ही ऑफर (दि. १८ ऑक्टो. ते १० नोव्हें) पर्यंत असून, यादरम्यान ग्राहकांकरीता भारत ट्रेडर्स च्या वतीने ग्राहकांसाठी ‘तांदूळ व गहू महोत्सवाचे’ आयोजनही केले जाणार आहे. जेणेकरून भारत ट्रेडर्सच्या ग्राहकांना अगदी माफक दरात सणासुदीसाठी लागणारी खरेदी करता येईल.
अगदी रोजच्या गरजेच्या वस्तूंपासून ते गहू तांदूळापर्यंतची खरेदी ग्राहकांकरीता एकाच छताखाली करण्याची सुवर्णसंधी ‘भारत ट्रेडर्स व बी मार्ट’ च्या माध्यमातून उपलब्ध होणार असून या संधीचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन खामकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
भारत ट्रेडर्सच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात आपली आणखी एक शाखा विस्तारण्याचा मानस असल्याचे खामकर यांनी सांगितले.