न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदोन्नती समितीची (४. सप्टें) रोजी बैठक झाली. यात कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांची सह शहर अभियंता या पदावर पदोन्नती करण्यात आलेली आहे.
याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी शुक्रवारी (दि.१९) रोजी विधी समितीसमोर ठेवण्यात येणार असून विधी समितीच्या मंजुरीनंतर महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समितीने संगीतले.