न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद आयुक्तांनी रद्दबातल केले असून नगरसेवक पदावर असताना त्यांनी उपभोगलेल्या लाभाची रक्कम पालिकेत तात्काळ जमा करण्याची करण्याची नोटीस प्रशासनाने गायकवाड यांना पाठविली आहे.
गायकवाड यांनी जवळपास दोन वर्षाचा कार्यकाळ उपभोगला आहे. त्यांना महिन्याकाठी मिळणारे एकूण १५ हजार रुपये मानधन व सभा भत्ता पोटी एकूण 2 लाख ५४ हजार रुपये पालिकेत जमा करावे लागणार आहेत.