न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- सोलापूर येथे बुधवार (दि. १७) रोजी राज्यस्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत शालेय विभागीय ‘धनुर्विद्या रिकर्व्ह’ प्रकारात चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचलित श्रीमती. के. जे. गुप्ता जुनिअर कोलेजच्या कु. मृण्मयी सुर्यकांत शिंदकर या विद्यार्थिनीने १९ वर्षाखालील मुलींच्या गटात उल्लेखनीय यश संपादन केले, त्यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.
विद्यालयाचे संस्थापक, अध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी या यशस्वी खेळाडूचे मनःपूर्वक अभिनंदन केले व केलेल्या कष्टाचे चीज झाल्याबद्दल मनापासून समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी उपाध्यक्ष जगदीश जाधव, संचालक, विजय जाधव, प्राचार्य बाळाराम पाटील, प्रतिभाताई देशपांडे, उपमुख्याध्यापक, किसन आहिरे, पर्यवेक्षक अनिल कर्पे, आदींनी यावेळी तिला शुभेच्या दिल्या.
क्रीडाशिक्षक शब्बीर मोमीन व दत्तात्रय भालेराव यांनी यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन केले.