न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी :- स्वीकृत नगरसेवक विनोदभाऊ तापकीर यांच्या वतीने काळेवाडीतील प्रभाग क्रमांक २२ भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विजयादशमी पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी काळेवाडीतील बाजीप्रभू चौक व परिसरात जागोजागी रांगोळी काढून ध्वजस्तंभावर पुष्पवृष्टी करण्यात आली, ‘जय श्रीराम’ या घोषणेने परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बूथप्रमुख अतुल नढे, ब्राम्हण महासंघाचे मंदार पाठक, रुपेश कदम, महेंद्र गिरासे, गजानन नढे, सुरेश पाटील, देविदास पाटील, प्रदीप कासार, महेश शिंदे, विशाल सपकाळ व महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.















