न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड परिसरात ऐन सणासुदीच्या दिवशीही पाण्याची बोंब असून, नागरिक मेटाकुटीला आलेली आहेत. अशा वेळी आपले मूलभूत प्रश्न सोडविणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे धाव घ्यावी लागते, परंतु लोकप्रतिनिधीनेच आपली प्रश्न सोडवण्याऐवजी समस्या का सांगतो? अशी विचारणा करून मारहाण केली तर …….. नागरिकाने पहावयाचे तरी कोणाकडे.
असाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात गुरुवारी (दि. १८) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडला आहे. सोसायटीमध्ये कमी पाणी आले, याची तक्रार एका नागरिकाने नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन केली. याचा राग मनात धरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार नागरिकाच्या घरी जाऊन संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली.
याप्रकरणी या प्रकरणी संतोष दोडके (वय ४३, रा. धीरज गोल्ड अपार्टमेंट, पिंपळे निलख, सांगवी) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अमोल कामठे, विशाल कामठे, प्रतीक दळवी, गणेश या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी सीसीटीव्ही पहावा, भांडण केलेले कर्मचारी माझ्या कार्यालयातील नाहीत, भांडणे माझ्या कार्यालयात झालेली नाहीत, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
तुषार कामठे (नगरसेवक, पिं. चिं. मनपा.)












