न्यूज पीसीएमसी नेटवर्क :-
काळेवाडी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच सोशल मिडीयावर अखंड बारा-बलुतेदार समाज बांधवांचे आदर्श, महानायक, राजे मल्हाररावजी होळकर यांच्या बाबतीत आक्षेपार्य विधान केले आहे.
यात त्यांनी महापुरुषांच्या नावाचा उल्लेख करताना “वाल्याचा वाल्मिकी व मल्याचा मल्हारराव होळकर” असे बेताल व अपमानजनक वक्तव्य केलेले आहे. या त्यांच्या वक्तव्याचा शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघाने खरपूस समाचार घेत जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाडांनी येत्या ४८ तासाच्या आत अखंड बारा-बलुतेदार समाजबांधवांची जाहीर माफी मागावी. सदर कालावधीत माफी न मागितल्यास शिवसेना स्टाईलने जाब विचारला जाणार असुन, वेळ पडल्यास अन्य मार्गांचाही अवलंब केला जाईल, असे शिवसेना तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले व शिवशाही व्यापारी संघांचे प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी सांगितले आहे.