न्यूज पीसीएमसी नेटवर्क :-
चिखली :- स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या सतर्कतेने पिंपरी चिचवंड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. कुदळवाडी परिसरात बऱ्याच ठिकाणी नवीन विजेचे खांब बसवताना जुने विद्युत खांब न काढता ते तसेच ठेवून नवे खांब बसवण्यात आलेले आहेत.
त्या जुन्या खांबाचा वापर महापालिकेच्या इतरत्र ठिकाणी होऊ शकतो. महापालिकेचा विदुयत विभाग अक्षम्य लापरवाई व चालढकल कारभार करत असल्याचे दिनेश यादव यांनी सांगितले आहे.
दिनेश यादव यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधिकारी सांवत यांना घटनास्थळी बोलावून सद्यपरिस्थितीची जाणीव करून दिली. या परिसरातील अनेक ठिकाणचे जुने वीजखांब दाखवून त्याचा उपयोग ईतर ठिकाणी करु शकतो, असे निदर्शनास आणून दिले.
स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील विविध क्षेत्रीय कार्यालयात विजेच्या खांबांचा तुटवडा भासत असून, या खांबांचा त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो अशी अधिकाऱ्यांची कानउघाडणीही यावेळी केली.
यावेळी अधिकाऱ्यांनी दिनेश यादव यांची मागणी मान्य करून, तात्काळ जुने वीज खांब काढून ते आवश्यकता असणाऱ्या इतर ठिकाणी पुरवले जाईल असे आश्वासन दिले.