न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड :- विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर (दि. १८) गुरुवार रोजी वाकड परिसरातील छत्रपती चौक येथे रिटेल क्षेत्रातील नावाजलेल्या भारत ट्रेडर्स च्या ‘बी मार्ट’ या नवीन दालनाचा भव्य शुभारंभ बि.व्ही.जी. ग्रुप चे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.
या विशेष सोहळ्यास सिनेअभिनेते पुस्कर चीरपुटकर यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमास सकाळ माध्यम समुहाचे शैलेश पाटील, उमेश पिंगळे, युवा नेते विकास एकशिंगे, शिवसंग्रामचे पांडुरंग आवारे पाटील, डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्रा. शिवाजी माने, भारत ट्रेडर्सचे मालक अर्जुन खामकर व सतीश खामकर आदी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना हनुमंत गायकवाड म्हणाले कि, ज्यादा टक्केवारीचा धंदा करण्यापेक्षा कमी फायदा झाला तरी चालेल, परंतु ग्राहकाला किफायतशीर किमतीत वस्तू व माल उपलब्ध झाला पाहिजे. गुणवत्ता, दर्जा, रास्त किंमत ही सदैव टिकून ठेवली पाहिजे. जेणेकरून पिंपरी चिंचवड शहर व उपनगरात बी. मार्टच्या ४०० ते ५०० शाखा व्हाव्यात, याकरिता वेळ लागणार नसून त्यासाठी दर्जेदार वस्तू व रास्त भाव हे समीकरण ग्राहकांना पटवून देण्याची आवश्यकता असल्याचे हनुमंत गायकवाड यांनी सांगितले.
भारत ट्रेडर्सचे मालक अर्जुन खामकर यांनी सांगितले कि, गेली २८ वर्षांपासून तहहयात ग्राहकांच्या सेवेकरीता खामकर कुटुंब प्रयत्नशील असून, विशेष प्रयत्नांती व खास वाकडकरांच्या आग्रहास्तव व विश्वासाच्या बळावर आपली कार्यकक्षा वाकडकरांच्या सेवेसाठी उपलब्ध केली आहे. ग्राहकांकरीता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताद्वारे पिकविलेल्या तसेच ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्ट्कोनाचा विचार करूनच वस्तूंचा समावेश आम्ही आमच्या दालनात करणार आहोत.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अहमदनगर येथील उद्धव काळेपघड यांनी तर आभार प्रदर्शन सतीश खामकर व प्रास्ताविक माने यांनी केले.