न्यूज पीसीएमसी नेटवर्क :-
मावळ :- तळेगाव औद्योगिक वसाहतीतील नवलाख उंब्रे येथील जे. सी. बी. इंडिया प्रा. लि. कंपनीतील जे. सी. बी. कामगार संघटनेच्यावतीने गेली अनेक वर्षांपासून कामगारांच्या पगारवाढीबाबत कंपनीच्या प्रशासनाकडे पाठपुरावा चालू होता.
या पाठपुराव्यास अखेर यश आले असून, बुधवार (१७. ऑक्टो.) रोजी जे. सी. बी. कामगार संघटना व जे. सी. बी. इंडिया प्रा.लि. कंपनीच्या प्रशासनामध्ये पगारवाढीसंदर्भात करार झाला असून, कराराद्वारे कामगारांना प्रत्यक्ष १८०७५/- रु. व अप्रत्यक्ष २१७७५/- रु. अशी भरघोस पगारवाढ मिळणार आहे. या संदर्भात संस्था व संघटनेमध्ये ३३ महीन्यांच्या करारावर मोहर उमटविण्यात आलेली आहे.
या करारानव्ये अनेक सवलती कामगारांना संस्थेकडून मिळणार आहेत. (प्लॅन्ट हेड) गुंजन मल्होत्रा, (एम डी) सुनील खुराणा, सिनीअर एच आर व्यवस्थापक विवेक गगपल्लीवार, डेप्युटी जनरल मॅनेजर उदय खरात, प्रॉडक्शन मॅनेजर संकेत विरकर, प्रॉडक्शन मॅनेजर अजय शर्मा व आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांचे कौतुक केले व संस्थेला आणखी प्रगतीपथावर घेऊन जाण्याकरिता यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी जे. सी. बी. कामगार संघटनेचे अध्यक्ष, निलेश काळोखे, सरचिटणीस, अशोक चव्हाण, उपाध्यक्ष, खंडेराव जाधव, उपाध्यक्ष, किरण पाटील, सह चिटणीस अमोल कुडले, सहचिटणीस, प्रशांत थोरात, खजिनदार, नागनाथ माळी, का. सदस्य, गोपाल जाधव, का. सदस्य, प्रविण परदेशी, का. सदस्य, संतोष शिंदे, का. सदस्य, संतोष भोसले यांनी काम पाहीले.