न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे :- सन २०१७ मध्ये स्थापन झालेल्या “महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशन” तर्फे “संगीत ऑलीम्पियाड परीक्षा” महाराष्ट्रातील ३२ जिल्हांमध्ये घेण्यात आली. शालेय अभ्यासक्रमात संगीत हा विषय मुलांना लहानपणापासून अभ्यासता यावा यासाठी सुरु केलेल्या ह्या परीक्षेच्या पहिल्या भरघोस यशानंतर महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशन तर्फे संगीत शिक्षण प्रमाणपात्रता ह्या विषयी चर्चासत्र आयोजित केले आहे.
हे चर्चासत्र महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशन, संगीत विभाग एस. एन. डी. टी. महाविद्यालय पुणे केंद्र व ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. यात “संगीत शिक्षण प्रमाणपात्रता”, “संगीत क्षेत्रात व्यावसायिक संधी”, “कलाकाराचा व्यक्तिमत्व विकास” असे चर्चासत्राचे प्रमुख विषय आहेत.
शाळेच्या संगीत शिक्षकांना Music Teaching Standardization Series1 या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमधील संगीत शिक्षकांनी एकत्र येऊन संगीत क्षेत्रात शिक्षण हे प्रमाणपात्र कसे करता येईल? विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच संगीताविषयी गोडी व गांभीर्य निर्माण कसे होईल? या विषयी मान्यवरांचे अनुभवी बोल ऐकून त्या पद्धती आत्मसात करणे हे या चर्चासत्राचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या चर्चासत्राचा कार्यक्रम पुण्यातील औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात बुधवार दिनांक २४. ऑक्टोबर. २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार असून यात डॉ. शीतल मोरे – संगीत विभाग प्रमुख, एस, एन. डी. टी. महाविद्यालय पुणे केंद्र, चैतन्य कुंटे – संगीत विभाग प्रमुख, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यालय, आनंद भाटे – विख्यात शास्त्रीय गायक, सावनी शेंडे – साठे – विख्यात शास्त्रीय गायक, डॉ. अलका वाडकर – प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, कौशल इनामदार – विख्यात संगीत दिग्दर्शक, कमलेश भडकमकर – विख्यात संगीत संयोजक व संगीत दिग्दर्शक, अविनाश चंद्रचूड – विख्यात संगीत दिग्दर्शक या पॅनल सदस्यांचा समावेश असणार आहे.
चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी करणे गरजेचे आहे, तसेच ही नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन RSVP पद्धतीने पूर्ण करणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ९१६८६३५०५५ वर संपर्क साधावा. नोंदणी साठी अंतिम तारीख 20 ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. नोंदणी साठी ऑनलाईन RSVP फॉर्म ची लिंक https://goo.gl/forms/7RROtzaLWTpivPem2 असून, या लिंकचा वापर करून आपला अर्ज जमा करण्याचे आवाहन स्वप्नील बांदोडकर, अध्यक्ष, महाराष्ट्र म्युझिक ऑलिम्पियाड असोसिएशन, डॉ. प्रवीण भोळे, विभाग प्रमुख, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यालय, डॉ. शीतल मोरे, संगीत विभाग प्रमुख, एस, एन. डी. टी. महाविद्यालय पुणे केंद्र, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यालय, डॉ. शीतल मोरे, संगीत विभाग प्रमुख, एस, एन. डी. टी. महाविद्यालय पुणे केंद्र यानी केले आहे.