न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव :- “नवरात्र उत्सव असू दे किंवा पालखी सोहळा, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलीस मित्र मोठ्या तन्मयतेने व सेवाभावी वृत्तीने नागरिकांना व पोलीस यंत्रणेला मदत करत असतात. उत्सवामध्ये पोलीस प्रशासनास जो कामाचा अतिरिक्त ताण निर्माण होत असतो तो ताण कमी करण्याचे कार्य सुरक्षा समितीचे पोलीस मित्र व विशेष पोलीस अधिकारी करीत आहेत. अनेक वर्षांपासून समितीचे स्वयंसेवक शहर व ग्रामीण विभागांमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे हे काम स्तुत्यच आहे.”
पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालयात नुकतेच सामील झालेल्या तळेगाव पोलीस ठाण्यात ४० पोलीस मित्र व एसपीओ यांचा सन २०१४ व २०१५ मध्ये उत्सव व पालखी सोहळ्यास सहकार्य करणाऱ्या पोलीस मित्र स्वयंसेवक, एपीओ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमरनाथ वाघमोडे बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय पाटील, कोथरूड विभाग अध्यक्ष नाना कुंबरे, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला अध्यक्षा अर्चना घाळी उपस्थित होते.
अड. विद्या शिंदे, सीमा निकम, अनुपमा पिसे, मौसमी घाळी, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे, अजय घाडी, अमित डांगे, आशिष गांधी, तेजस सापरिया, बाबासाहेब घाळी, अंकुश घारे, सागर कुडे, नितीन मांडवे, संदीप सकपाळ, राम सुर्वे, संकल्प सुर्यवंशी, मंगेश घाग, राजकुमार कांबिकर, बळीराम शेवते, सतीश देशमुख, उद्धव कुंभार, लक्ष्मण इंगवले, उमेश कांगुडे, पुरुषोत्तम जाधव, प्रदीप पिलाणे, तुकाराम दहे या एसपीओ आणि पोलीस मित्रांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.