न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी :- शिवसेना पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा“ संवाद खासदारांचा थेट जनतेशी” हा उपक्रम रविवार दि. २१/१०/२०१८ रोजी सायं ६.०० वा. श्री विठ्ठल मंदिर, आकुर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, पिंपरी विधान सभेचे आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, महिला संपर्क प्रमुख वैशालीताई सुर्यवंशी, पिंपरी विधानसभा संघटक प्रमोद कुटे, मधुकर बाबर, शिवसेना नगरसेवक व नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचे संभाजी महाराजांवरती व्याख्यान व मार्गदर्शन आयोजित केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातुन मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे गेल्या चार वर्षेत जनतेशी सर्वाधिक संपर्क साधत आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघातील जनतेचे प्रश्न जाणुन घेवुन ते मार्गी लावण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या माध्यमातुन पिंपरी विधानसभा मतदार संघातील नागरीकांशी “संवाद खासदारांचा थेट जनतेशी ”या उपक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विधासभा मतदार संघाचे विधानसभा संघटक प्रमोद कुटे व मधुकर बाबर यांनी केले असुन, या कार्यक्रमास अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.