न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- केंद्र सरकारच्या झू अॅथॉरेटी निर्देशानुसार महापालिकेचे बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय हे छोटे प्राणीसंग्रहालय वर्गात येत असून केंद्राची मान्यता कायम करण्याकरीता क्युरेटर, संचालक, पशुवैद्ययक या पदावर अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे.
त्यामुळे मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांच्याकडे विभाग प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्याकडे क्युरेटर, संचालक, पशुवैद्ययक पदाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.
तसेच निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे कामकाज कर्मचाऱ्यांच्या आस्थापनेसह उद्यान विभागाकडे वर्ग केला असल्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.