न्युज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई :- दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. १४ आणि १५ नोव्हेंबर, हा शुभमुहूर्त दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया हँडल्सवरून जाहीर केला आहे. पण तो कुठे होणार, हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही.
“आम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आमच्या कुटुंबीयांच्या आशीर्वादाने आम्ही १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ ला विवाहबद्ध होत आहोत. तुम्ही आमच्यावर जे भरभरून प्रेम केलं, त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो. प्रेम, मैत्री आणि विश्वासाने भारलेल्या या प्रवासासाठी आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे,” असं दीपिका आणि रणवीर यांनी या पत्रिकेत म्हटलं आहे.