न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- रस्ता बांधणीसाठी महापालिकेच्या कंत्राटदाराने “स्टोअर रूम’मध्ये ठेवलेले पावणे दोन लाखांचे साहित्य चोरट्याने लंपास केले.
पुनावळे येथे सदर घटना घडली असून, विनोद ग्याचंद रोहिडा (वय ४१, रा. कोकणे चौक, रहाटणी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात रविवारी (दि. २१) रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











