न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांमधील बोगसगिरी वारंवार निदर्शनास आल्याने नागरवस्ती विभागाने कठोर पाऊले उचलली आहे.
या विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी स्वतः लक्ष घालून येथील शिवणयंत्र वाटपासाठी लाभार्थ्यांनी मशीन खरेदी करावी व त्या खरेदीची जीएसटी पावती दाखवून लाभ मिळवावा, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिवणयंत्र वाटपातील बोगस लाभार्थ्यांना चाप बसला.
त्याच धर्तीवर आता सायकल योजनेसाठी स्मिता झगडे यांनी हा निर्णय घेतला आहे. नागरवस्ती विभागातर्फे पात्र विद्यार्थ्यांना अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे. हे अर्ज आठही क्षेत्रीय कार्यालयात स्वीकारले जात आहेत. १ एप्रिल ते १९ ऑक्टोबर या कालावधीत नागरवस्ती विभागाकडे ३ हजार ३७५ अर्ज आले आहेत.











