न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव :- स्व. राजीव गांधी प्रतिठाणचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटी मा. अध्यक्ष संदेश नवले यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, रिंग रोड, पाणीप्रश्न, कचरा या प्रश्नांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, याकरीता सहकुटुंब पंढरपूरच्या विठुराया चरणी मस्तक ठेऊन महापूजा केली.
यानिमित्ताने सत्ताधारी पक्षाचा अनागोंदी कारभार सुरळीत व्हावा, शहरातील नागरिकांच्या सर्व समस्यांची आयुक्तांनी दखल घेऊन उकल करावी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा डंका आशिया खंडात निर्विवादपणे रहावा, सत्ताधारी भाजपला शहराचे प्रश्न सोडविण्याकरीता सुबुद्धी द्यावी, असे साकडेही नवले यांनी विठूरायाचरणी घातले आहे.















