न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- प्रभाग क्रमांक ८ औंध – बोपोडीच्या नगरसेविका सुनिता वाडेकर यांनी शुक्रवार (दि. २६) रोजी प्रभागातील विविध विकासकामांची पाहणी केली. वॉर्डस्तरीय निधीतून प्रभागात अनेक विकासकामे चालू आहेत.
यावेळी नगरसेविका सुनिता वाडेकर यांनी प्रभागातील प्रगतीपथावरील मस्जिद मोहल्ला, परदेशी चाळ, बोपोडी या परिसरातील संपूर्ण सुलभ शौचालयाचे दुरुस्तीचे कामांची पाहणी केली.
परिसरात या ठिकाणी नवीन दरवाजे, नवीन डेनेज, संपूर्ण सुलभ शौचालयची पेंटिग व ईतर कामे करण्यात आली असून, शौचालयाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सिमेंटचा रस्ता नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे.










