न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- आदित्य माने व विक्रम माने यांच्या पुढाकाराने लायन्स क्लब ऑफ आकुर्डीच्या सहकार्याने चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मधील वंचित ४०० मुलांसाठी अन्नदान उपक्रम राबविण्यात आला.
अमेरिकेतून खास आयात केलेल्या अत्याधुनिक नेत्र तपासणी मशिनद्वारे येथिल ३ ते १० वयोगटातील लहान मुलींच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली, तसेच ह्या गुरुकुल मधील वर्गात प्रथम येणाऱ्या मुलाचा प्राविण्य प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आदित्य व विक्रम माने परिवारास शुभेच्छा देऊन, ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. प्रांताचे उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांनी लायन्स परिवारातर्फे केल्या जात असलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती यावेळी दिली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, आकुर्डी क्लबचे अध्यक्ष हिरामण गवई, प्रदीप नागणे, असीम गांधी, राजेंद्र कोळी, अनिल दांडदे, विठ्ठल झोडगे, वसंत गुजर, मोहन पाटील, श्रद्धा पेठे, अर्चना कोळी, स्वाती माने, विजय माने, संदीप देसाई, वावले आदी उपस्थित होते.










