न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली :- आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (दि. २८ ऑक्टो.) रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत भोसरी मतदारसंघातील चिखली कुदळवाडी येथे विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत, मतदार नोंदणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘फ प्रभाग’ स्वी. सदस्य दिनश यादव यांनी प्रसिद्धीपत्राकाद्वारे दिलेली आहे.
राज्य निवडणूक आयोगातर्फे मतदारांना यादीत नाव नोंदण्यासाठी ‘विशेष मतदार नोंदणी मोहीम’ राबविण्यात येत असून, नवीन नाव नोंदणी, मतदारांच्या नावात अथवा पत्त्यामध्ये बदल तसेच दिव्यांग मतदार नोंदणी करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
याकरीता परिसरातील नागरिकांनी ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, जन्म दिनांक पुरावा यापैकी उपलब्ध कागदपत्रांपैकी एका कागदपत्राची स्व-साक्षांकित प्रत जोडावी व अर्ज जमा केल्याची पावती घ्यावी. या मोहिमेस परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी केले आहे.















