न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी (दि. ३ नोव्हें.) रोजी पिंपरी चिंचवड शहर, मावळ, खेड, मुळशी तालुक्यातील संघटीत, असंघटित कष्टकरी व औद्योगिक कामगारांच्या कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिष्ठानचे व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे ही कामगार परिषद दुपारी तीन ते सात या वेळेत होणार आहे. या परिषदेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व मा. कृषीमंत्री शरद पवार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक आदी उपस्थित राहणार आहेत.