न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी पोलिसांनी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर बेटिंग लावणाऱ्या दोन आरोपींना रविवारी (दि. २८) रोजी रात्री अकराच्या सुमारास वैभव नगर, पिंपरी येथे अटक केली आहे.
राम गोवर्धन बजाज (वय ४४, रा. वैभव नगर, पिंपरी), गोविंद प्रभूदास ललवाणी (वय ४१, रा. वैष्णव देवी मंदिराजवळ, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार राम गोवर्धन बजाज (वय ४४, रा. वैभव नगर, पिंपरी), गोविंद प्रभूदास ललवाणी (वय ४१, रा. वैष्णव देवी मंदिराजवळ, पिंपरी) या आरोपींवर मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे दोन आरोपी संत कंवर, राम पार्क, वैभव नगर येथील आरोपी बजाज याच्या घरी बेकायदेशीरपणे बेटिंग घेत होते. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळावर छापा मारून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील एलईडी टीव्ही, मोबाईल फोन व २ लाख २३ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.










