न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- मा. नगरसेवक दत्तात्रय पवळे यांच्या प्रेरणेने रविवार (दि. २८ ऑक्टो.) रोजी देहू येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.
दिवंगत महापौर मधुकरराव पवळे प्रतिष्ठान, जय बजरंग तरुण मंडळ निगडी, देहू येथील प्रदीप काळोखे, मा. उपसरपंच बाबा भालेकर, मा. नगरसेवक राजेंद्र साळुंखे, सदस्य संदीप शिंदे, तुकाराम चिखले, निगडी येथील ५० युवा व जेष्ठ कार्यकर्ते आदींनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून श्रमदान केले.
या मोहिमेंतर्गत इंद्रायणी नदी व घाटावरील परिसराची स्वच्छता केली. तब्बल ५ ट्रक कचरा व गाळ काढण्यात आला. या परिसरात नवरात्र झाल्यानंतर देवी विसर्जनासाठी घाटावर गेलो असता, तेथील अवस्था पाहून वाईट वाटले व घाट स्वच्छ करण्याकरीता परिसरातील नागरिक व सामाजिक संस्थाना आवाहन केले, असे दत्तात्रय पवळे यांनी सांगितले.