न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईस प्रारंभ केला असून, चिखली येथील रस्त्यावर कचरा टाकणा-या ट्रक चालकांकडून दहा हजार रूपयांचा तर उद्यमनगर नेहरूनगर येथील वैद्यकीय वापरातील कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल वायटल हॉस्पिटल यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.
कारवाईत क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आरोग्य निरीक्षक वैभव कांचनगौडार, सचिन जाधव, विक्रम सौदे आदी सहभागी झाले होते.










