न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा आज (दि. ३०) रोजी पार पडली. यावेळी सदस्या नम्रता लोंढे यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी मांडलेल्या प्रस्तावास मान्यता दिलेली असतानासुद्धा या प्रस्तावाची अंमलबजावणी का झाली नाही? अशी विचारणा केली असता आयुक्तांनी जुजबी उत्तरे दिली.
यावर स्थायी सदस्य विकास डोळस यांनी आक्रमक पवितत्रा घेत, आयुक्तांना फैलावर घेतले. भोसरी मतदार संघातील नगरसेवकांची कामे आले की धोरण, पॉलिसी कशी अडवी येते. वारंवार असे का होते? जाणीवपुर्वक तुम्ही करत आहत का? भोसरीतील नगरसेवकांनाच धोरणे का आडवी येतात? अशा प्रकारे आयुक्तांना सुनावले. प्रशासनाचा हा दुजाभाव यापुढे खपवून घेतला जाणार नाही. क्रीडा विभागाअंतर्गत असलेली क्रीडांगणे, व्यायामशाळा अशा सर्वच आस्थापनांचे करार रद्द करुन, धोरण ठरविल्यनंतरच त्यांचे वाटप करावे, अशी मागणी डोळस यांनी केली.










