न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- राष्ट्रीय एकता दिनी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वाढदिवशी उद्या दि. ३१ रोजी पिंपरी चिंचवड शहरात एकता दौडचे आयोजन केले आहे. केंद्र सरकारने हा उपक्रम २०१४ ला सुरू केला. तेव्हा पासून पिंपरी-चिंचवड शहरातही दौड आयोजित केली जाते.
स्पाईन रोड, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी ते भेळ चौक एकता दौड आहे. सकाळी साडे सहा वाजता आमदार लक्ष्मण जगताप दौडला हिरवा झेंडा दाखवतील. दौडमध्ये विद्यार्थी, खेळाडू, युवक, युवती व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक नगरसेवक नामदेव ढाके व शीतल शिंदे यांनी केले आहे.










