न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड येथील पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आज बुधवार (दि. ३१) रोजी पहाटे अडीच ते चार या वेळेत, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे ३५० सोसायट्यांना सरप्राईज भेट दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने उपनिरीक्षक हरीष माने यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन एकूण ३५ पथके तयार केली. प्रत्येक पथकास नियोजनानुसार दहा सोसायट्यांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी सोसायट्यांमध्ये जाऊन तपासणी असता, तब्बल ८० टक्के सोसायट्यांचे सुरक्षा रक्षक झोपलेल्या अवस्थेत आढळले.
यादरम्यान झोपलेल्या सुरक्षा रक्षकांचे फोटो काढले व एक पत्र ती सोसायटी आणि सुरक्षा रक्षक एजन्सीला देण्यात येणार असल्याचे, पोलिसांनी सांगितले.










