न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे :- पुणे शहरातील शुक्रवार पेठ परिसरात एका तरुणावर दोन अज्ञात तरुणांकडून गोळीबार करण्यात आला आहे. बुधवार (दि. ३१) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. यात तरुण जखमी झाला असून, पुढील उपचारांसाठी त्याला ससून रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगश धुमाळ (वय ३२, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ, पुणे) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवार पेठेतील शिंदे आळीमध्ये अज्ञातांकडून हा गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.










