न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी रेल्वे स्थानकाची लांबी कमी असल्यामुळे स्थानकावर आलेल्या रेल्वे गाडीचे डब्बे प्लॅटफॉर्मच्या बाहेर जात आहेत. प्रवाशांना गाडीत बसताना व उतरतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बऱ्याच वेळा प्रवाशांचा येथे अपघात झाला आहे. अपघात आणि प्रवाशांच्या समस्या टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याकरीता रेल्वे स्थानकालगत असलेल्या भाजी मंडई परिसरातील अनधिकृत दुकाने हटवण्यास लोहमार्ग पोलीस व “आरपीएफ’ जवानांच्या फौज फाट्यासह सुरूवात केली आहे.
रेल्वे प्रशासनाने पिंपरी रेल्वे स्थानकालगत असलेल्या पिंपरी भाजी मार्केट येथील ५५ फळ-भाजी विक्रेते व अनधिकृत दुकानांना नोटिसा दिल्या आहेत.










