न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. २६ वाकड-पिंपळे निलख परिसरात स्थायी समिती सभापती, ममताताई विनायक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विकासकामे चालू वर्षामध्ये करण्यात येणार आहेत. यावेळी अनेक मुलभूत समस्यांवर कायमचा उपाय करण्यासाठी त्यांनी विकासकामांवर जास्त लक्ष दिलेले आहे. आज त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र २६ वाकड-पिंपळे निलख मध्ये होऊ घातलेली अनेक विकासकामे जाहीर केली.
पाणीप्रश्न
प्रामुख्याने वाकड-पिंपळे निलख परिसरात पाण्याची समस्या असल्याने यावर कायमचा उपाय म्हणून आता २४x७ अमृत योजनेअंतर्गत संपूर्ण प्रभागात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू झाले व अनेक दिवसांपासून प्रयत्न करून लवकरच उभारत असलेली २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी. यामुळे वाकड-पिंपळे निलख मधील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.
रस्ते
वाकड-पिंपळे निलख परिसरातील रस्ते हे सिमेंट कॉंक्रीटकरण करून अद्ययावत करणे, यामध्ये मॉडेल रोड करून नागरिकांना वाहतुकीसाठी, चालण्यासाठी सुसज्ज असे सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते लवकरच होत आहेत. यामध्ये कावेरी सब वे ते पिंक सिटी कॉर्नर पर्यंत डी. पी. रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक पर्यंत रोड रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, विशालनगर वाघजाई हॉटेलपासून ते कस्पटे चौकापर्यंत २४ मी. डी. पी. रस्ता सिमेंट काँक्रिट करणे व वाकड पिंपळे निलखमधील अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रिटचे करणे, अशा या रस्त्यांचा विकास करणार आहे.
विरंगुळा केंद्र
ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे असे विरंगुळा केंद्र उपलब्ध नाही, याकरीता वाकडमध्ये ज्येष्ठांसाठी प्रशस्त असे विरंगुळा केंद्र या परिसरात उभारत आहे.
लिनियर गार्डन
लहान मुले व नागरिकांना वाकड-पिंपळे निलख मध्ये सुसज्ज असे लिनियर गार्डनच्या धर्तीवर वेणुनगर येथे गार्डन विकसित होत आहे.
स्मशान भूमी
कस्पटेवस्ती येथील स्मशान भूमी विकसित करून अद्ययावत करण्यात येणार आहे. यामध्ये विद्युत दाहिनीसुद्धा असणार आहे तसेच पर्यावरणपूरक व नागरिकांना धुराचा त्रास होऊ नये म्हणून, योग्य ते आउटलेट्स असणार आहेत.
यावेळी बोलताना स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड म्हटल्या की अशा अनेक विकासकामांमार्फत वाकड, पिंपळे निलखमधील नागरिकांना दिवाळी भेट देत आहोत व यापुढेही अनेक चांगल्या प्रकारची विकासकामे या परिसरातील नागरिकांना अनुभवायला मिळतील.