न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचा वार्षिक निवडणुक कार्यक्रम बुधवार (दि. ३१) रोजी पिंपरीतील मोरवाडी कोर्टात पार पडला. यावेळी अध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. सुनील कडूसकर व अॅड. मनोज अगरवाल यांच्यात तुल्यबळ लढत झाली.
यात अध्यक्षपदी अॅड. सुनील कडुसकर यांनी बाजी मारली. उपाध्यक्षपदी अॅड. योगेश थंबा यांची निवड करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, हेमंत डांगे व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर व पदाधिकारी, सदस्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
अॅड. सुहास पडवळ, अॅड. संदीप चिंचवडे, अॅड. देवराम ढाळे, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. उत्तम चिखले, अॅड. अनिल तेजवानी, अॅड. विजय शिंदे, अॅड. रघुनाथ सोनवणे, अॅड. सुशील मंचरकर, अॅड. विलास कुटे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
अॅड. पूनम राऊत, अॅड. सुनील रानवडे, अॅड. रामचंद्र बो-हाटे, अॅड. विजय बाबर, अॅड. निलेश ठोकर, अॅड. केशव घोगरे यांची सदस्यपदी निवड झाली. हिशोब तपासणीस अॅड. महेश टेमगिरे यांची बिनविरोध निवड झाली. सहसचिवपदी अॅड. अकुंश गोयल तर खजिनदारपदी अॅड. संतोष मोरे यांची निवड झाली.