न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगांव :- अनेक वर्षांपासून गंगा आशियाना, गंगा मिडोज, पवारनगर, थेरगाव गावठाण, काळेवाडी फाटा मार्गे पिंपळेनिलख बससेवा सुरु करण्याकरीता मा. नगरसेविका झामाबाई बाळासाहेब बारणे व सिद्धेश्वर बारणे यांनी पीएमपीकडे पाठपुरावा सुरु केला होता.
दिवाळीच्या मुहूर्तावर हा प्रश्न सुटला असून, पीएमपीने गंगा आशियाना, गंगा मिडोज, पवारनगर, थेरगाव गावठाण, काळेवाडी फाटा मार्गे पिंपळेनिलख बससेवा अखेर सुरु केली आहे.
मा. नगरसेविका झामाबाई बारणे यांच्या हस्ते या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिध्देश्वर बारणे, नागरिक उपस्थित होते.