न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी प्रतिनिधी (३ नोव्हें.) :- आज शनिवार (दि. ३) रोजी भारतीय जनता पक्षाची जाहीर सभा निगडितील मदनलाल धिंग्रा मैदानावर होणार आहे. या सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या निमित्ताने आगामी निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यापासून शुभारंभ करणार असल्याचे वृत्त आहे.
या पार्श्व् भूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सभेस विरोध करण्यासाठी शहरातील मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले कार्यकर्त्यांसमवेत निगडीतील भक्ती-शक्ती चौकात गाजर आंदोलन आंदोलन करणार होते. हे वृत्त समजताच पोलिसांनी तात्काळ आज दुपारी सभेस सुरुवात होण्याच्या तासभर अगोदर सचिन चिखले यांना अटक केली असून, त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली असल्याचे समजते.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर सहभागी होणार असल्याचे समजताच पोलिसांनी भापकर यांच्या राहत्या घरीच त्यांना नजरकैदेत ठेवले असल्याची घटना घडली आहे.