न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (३ नोव्हें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आज शनिवार (दि. ३) रोजी थेरगाव उपविभागास पाणीपुरवठा करणा-या मुख्य गुरुत्ववाहिनीच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
याचा रहाटणी, श्रीनगर, विजयनगर- काळेवाडी, लक्ष्मणनगर, गणेशनगर, थेरगाव परिसर, कस्पटेवस्ती, पिंपळे निलख, वाकड परिसरातील पाणी पुरवठ्यावर परीणाम होणार असून, या परिसरातील दुपारनंतरचा तसेच सायंकाळचा पाणीपुरवठा उशीरा व कमी दाबाने होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.