न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी-प्राधिकरण (३ नोव्हें.) :- भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज शनिवार (दि. ३ नोव्हे.) रोजी निगडी-प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर ‘अटल संकल्प महामेळावा २०१९’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सभेस संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांची सत्ताधारी भाजपने सोडवणूक केली असून, पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, शास्तीकराचा प्रश्न सोडवला असून तसेच अनधिकृत बांधकामांचा प्रश्नही लवकरच सोडवणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार मावळ आणि शिरुर मतदार संघातून संसदेत पाठवू. ते मित्र पक्षाचे देखील असतील. परंतु, मोदींना पाठिंबा देणार नसाल तर, दोन्ही मतदार संघातून भाजपचे खासदार निवडून आणले जातील, २०१४ मध्ये आम्ही निवडून आलो. त्यावेळी मोदी लाट होती परंतु, आता २०१९ मध्ये या लाटेची सुनामी केल्याशिवाय राहणार नाही. गेल्या ६० वर्षामध्ये विरोधी पक्षाने सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या संधी न देता कायमच गरीब ठेवले आहे. सत्ताधारी भाजप अनेक नवनवीन योजनांच्या माध्यमातून सवर्सामान्यांच्या आयुष्यत आमूलाग्र बदल आणत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याप्रसंगी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीष बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, पक्षनेते एकनाथ पवार, आझम पानसरे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, नगरसेवक शैलेश मोरे, शीतल शिंदे, अमोल थोरात, भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व मोठ्या संख्यने जनसमुदाय उपस्थित होता.