न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. ५ नोव्हें.) :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या अंतर्गत पुणे विभागिय प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे महासचिव यांच्या आदेशानुसार गुरुवार (दि. १ नोव्हें.) रोजी इंदोरी (मावळ) येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास पुणे विभागीय अध्यक्ष चंद्रकांत वाव्हळ, जेष्ठ उपाध्यक्ष सत्यवान कहाणे, सचिव अडव्हेकेट राजेश येवले, उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे, दिलीप शिंदे, भरत फल्ले, प्रकाश गिधे, गणेश शेडगे, मा. उत्तर पुणे अध्यक्ष मारुती फल्ले आदी मान्यवर व उत्तर पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, शिरूर, खेड, आंबेगाव आणि जुन्नर ) तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरुवातीस मारुती फल्ले यांची पदोन्नती झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष पदासाठी नावे मागविण्यात आली. त्याप्रमाणे पाच फॉर्म भरून समोर आले. त्यानंतर सर्व समाजबांधवांनी आणि संघटनेच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी एक नाव सर्वानुमते सुचवण्याची विनंती केली. परंतु, एकमत न झाल्यामुळे सहा तालुक्यातील सर्व अध्यक्षांनी आपले अमूल्य गुप्त मतदान करून पुणे विभागिय अध्यक्ष व सचिव यांच्याकडे सोपविले.
त्यानंतर माननीय विभागीय अध्यक्ष यांनी उत्तर पुणे जिल्हा प्रांतिक तैलिक महासभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर दुर्गुडे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर दुर्गुडे यांचा शाल श्रीफळ देऊन माननीय पुणे विभागिय अध्यक्ष व सचिव आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इंदुरी येथील उद्योजक राऊत कुटुंबियांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राऊत कुटुंबातील जेष्ठ सदस्य व पालखी सोहळ्याचे मा. अध्यक्ष अनिल राऊत यांनी आभार मानले.