न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१४ नोव्हें) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांस्कृतिक वैभवात भर पडावी या हेतूने “कर्मचारी महासंघ” यांच्या वतीने शुक्रवार दिनांक १६ नोव्हेबर २०१८ रोजी महापालिका भवन येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत दिपावली फराळ व सनई चौघडा वादन तसेच सांयकाळी ५ ते ७.३० वाजता “दिपोत्सोव व दिपावली संगीत संध्याकाळ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास महापौर, सर्व समितिचे चेअरमन, आमदार, खासदार, नगरसेवक, सर्व अधिकारी, कर्मचारी, महासंघ पदाधिकारी व सर्व आजी व सेवा निवृत्त कामगार बंधू-भगिनी उपस्थित राहणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमास अंदाजे ३००० कामगार उपस्थित राहणार असल्याचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.