न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हें.) :- पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शिधापत्रिकाप्राप्त नागरिकांनी त्या शिधापत्रीकेद्वारे सलग तीन महिने धान्य खरेदी न केल्यास ती शिधापत्रिका रद्द केली जाणार असल्याची माहिती, अन्न व पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सध्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ११ परीमंडळामधील एकूण ६४ हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आलेल्या आहेत. रद्द शिधापत्रिका धारकांना यापुढे धान्य घ्यायचे असेल, तर तीन महिने धान्य का घेतले नाही? याचा खुलासा लेखी स्वरूपात द्यावा लागणार आहे.