न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना माघारी शासन सेवेत पाठविण्याचा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
नव्याने स्थापन झालेली शिक्षण समितीचे पदाधिकारी व सदस्य त्यांच्या कामगारीवर नाराज आहेत. प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे या राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर पालिकेत रूजू झाल्या आहेत. प्रथमच त्या पालिका सेवेत कार्यरत आहेत.
मात्र, त्यांच्या कामकाजावर नव्याने स्थापन झालेली शिक्षण समितीचे पदाधिकारी व सदस्य नाराज आहेत. समिती सभेच्या विषयपत्रिका तयार केल्या जात नाहीत. शाळांसाठी ठोस नियोजन केले जात नाही. शाळांचा दर्जा वाढीसाठी त्यांच्याकडून काहीच प्रयत्न केले जात नसल्याचे आरोप पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी केले आहे.