न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हें.) :- स्पेन येथील बार्सिलोना शहरात ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस २०१८’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण ‘रिप्रेझेंटेटिव्ह स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेस’ यांच्यामार्फत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीस मिळाले आहे.
या परिषदेत सहभागी राहण्यासाठी सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण व सह शहर अभियंता राजन पाटील हे सोमवारीच पोहचले आहेत.
महापौर राहुल जाधव हे तीन दिवसानंतर आज गुरुवार (दि. १५ ) रोजी परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत, त्यांच्या दौऱ्यात उशिरा सहभागी होण्यावरून राजकीय वर्तुळात खलबत चालू आहेत.