न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी(१६ नोव्हें) :- फुगेवाडी व परिसरात बीआरटीच्या चुकीच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोज वाखारे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.
फुगेवाडी येथील बीआरटी मर्ज इन व मर्ज आउट हा खूप चुकीचा केलेला आहे. फुगेवाडीतून मेगामार्ट समोरून पिंपळे गुरवला जाताना व फुगेवाडी-दापोडीच्या दिशेने जाताना वाहन एकमेकांना क्रॉस करून जातात, त्यामुळे फुगेवाडीमध्ये दररोज अपघात होतात. या घटनेमुळे परिसरातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकयांना बसस्थानकाकडे जाताना रस्ता ओलांडताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बसच्या तिकीटदारामध्ये फुगेवाडीतील दोन्ही बीआरटी एकमेकांपासून अंदाजे १०० पाऊले सुद्धा नाहीत. तरी दोन्ही बसस्थानकामध्ये एखाद्या ठराविक ठिकाणी जाताना तिकीटदरात तफावत दिसते. त्याचा आर्थिक बोजा स्थानिकांवर पडत आहे.
आयुक्तांनी बीआरटी, ग्रेड सेपरेटर तसेच मेट्रोच्या कामामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली काढावा, अन्यथा आगामी काळात स्थानिक नागरिकांच्या वतीने महापालिकेवर आंदोलन छेडण्यात येईल, असे मनोज वाखारे यांनी निवेदनात नमूद केले आहे.